द्विपक्षीय चर्चेसाठी पाकिस्तानने पोषक वातावरण निर्मिती करावी

0
80
भारताचे पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रथमच भाषण करताना नरेंद्र मोदी.

पंतप्रधान मोदी यांचे युनो आमसभेत प्रतिपादन
शेजारी देशांशी सहकार्यासाठी माझ्या सरकारचे प्राधान्य आहे. त्याच दृष्टीकोनातून आम्हाला पाकिस्तानशी द्विपक्षीय पातळीवर सुसंवाद साधायचा आहे. मात्र त्यासाठी पोषक अशी वातावरण निर्मिती पाकिस्तानने करावी लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना केले. प्रारंभीच त्यांनी भारताचा पंतप्रधान म्हणून या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळाली याबद्दल अभिमान वाटत असल्याचे नमूद केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्र आमसभेत हिंदीतून भाषण करणारे मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. आपल्या भाषणात मोदी पुढे म्हणाले, ‘दोन देशांमधील प्रश्‍न सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात मुद्दे उपस्थित करणे हा मार्ग नव्हे. पाकिस्तानबरोबर गांभीर्यपूर्वक बोलणी करण्यासाठी आम्हाला पोषक असे शांततापूर्ण वातावरण हवे आहे. असे विचारायचे आहे की सरकारी नोकर्‍या या केवळ भाजप कार्यकर्त्यांनाच देण्यात येत आहेत काय. नोकर्‍यांसाठीच्या मुलाखतीत जे उमेदवार गुणवत्तेद्वारे परीक्षेत उत्तीर्ण होत असतात त्यांचे काय. भाजप कार्यकर्त्यांची मुले असलेल्या उमेदवारांना नोकर्‍यात सामावून घेता यावे यासाठी मुलाखतीच्या निकालात हस्तक्षेप करण्यात येतो काय, असा प्रश्‍नही कामत यांनी उपस्थित केला. त्या आड दहशतवादाची सावलीसुद्धा येता कामा नये. दहशतवाद नव्या नावासह नवा आकार घेत आहे. अशावेळी संयुक्त राष्ट्र संघ असताना आम्हाला अनेक ‘जी’ मंचांची गरज का म्हणून पडावी? संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा विस्तार होणे आवश्यक आहे’ असे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी सांगितले की, आपण सर्वांनी सर्व मतभेद विसरून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादावर सर्वंकष परिषदेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले.
भारत आर्थिक व सामाजिक बदलांतून मार्गक्रमण करीत आहे. भारत जगाकडे वैश्‍विक कुटुंब म्हणून पाहतो, असे सांगून जागतिक लोकसंख्येपैकी १/६ लोकांचे भारत हे वसतीस्थान आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताने जागतिक समृद्धीचा नेहमी पुरस्कार केला आहे, असे ते म्हणाले. जगातील २०० देशांच्या प्रतिनिधींसमोरील आपल्या ३२ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी जागतिक दहशतवादाविरोधात भाष्य केले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शुक्रवारी येथे काश्मीरप्रश्‍नी भारतावर केलेल्या टिकेला त्यांनी अप्रत्यक्षपणे चोख उत्तर दिले. अनेक देश दहशतवादाला खतपाणी घालत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोणताही एखादा देश जगावर हुकमत गाजवू शकत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. मोदी यांचे भाषण संपल्यानंतर त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी युनोतील प्रतिनिधी रांगेत उभे राहिले होते.