पोलीस मुख्यालयात आज स्मृती दिन

0
77

पणजी
पणजीतील गोवा पोलीस मुख्यालयात आज दि. २१ रोजी ६० वा वार्षिक पोलीस स्मृती दिन पाळण्यात येणार आहे. १ सप्टेंबर २०१७ आणि ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत सेवा बजाविताना आपला प्राण गमावलेल्या पोलीस आणि पॅरा मिलीटरी अधिकार्‍यांना गोवा पोलीसांतर्फे आदरांजली वाहण्यात येईल आणि त्यानंतर शस्त्रे उलटी पकडून पोलीस हुतात्म्यांना आदरांजली वाहतील. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात येईल. पोलीस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर हुतात्म्यांना आदरांजली वाहतील. दि. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चीनने लडाख येथील भारतीय पोलीस पोस्टवर हल्ला करून १० पोलीस कर्मचार्‍यांना मारले होते. या पोलीस हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी देशभर हा दिवस पाळण्यात येतो.