पोलीस नोंद नसलेल्या महिलांवरील अत्याचारांचा शोध

0
125

भारतभरात दरदिवशी कित्येक महिलांवर बलात्कार होत असतात तसेच कित्येक महिलांचे विनयभंगही होत असतात. पण विविध कारणांसाठी सगळ्याच महिला पोलिसात तक्रार करण्यासाठी पुढे येत नसतात. या पार्श्‍वभूमीवर ‘सेफसिटी’ या बिगर सरकारी संघटनेने भारतभरातील अशा पीडीत महिलांच्या कहाण्या ऐकून त्यांची नोंद करून ठेवण्याचे काम हाती घेतले असल्याचे या संघटनेच्या प्रमुख एल्सा मारिया डिसिल्वा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
आपल्या कहाण्या सांगणार्‍या महिलांची नावे गुपित ठेवली जाणार आहेत. आतापर्यंत अशा प्रकारच्या २८०० कहाण्या ५० शहरांतून मिळवण्यात आलेल्या आहेत. अजून ज्या महिलांना आपल्यावरील अत्याचाराची कहाणी सांगायची आहे त्यांना ुुु.ीरषशलळींू.ळप या संकेतस्थळावर अथवा फेसबुकवर (ीरषशलळींू.ळप) किंवा ींुळींशीऽींळपींहशलीशशि वर शेअर करता येतील, असे डिसिल्वा यांनी सांगितले. त्याशिवाय पुढील महिन्यापासून मीसडाईल सेवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी +९१९०१५५१०५१० वर मिसकॉल करता येईल. नंतर आमचे कर्मचारी सदर फोनवर कॉल करून संबंधितांची कहाणी रेकॉर्ड करतील. लैंगिक अत्याचाराची खूपच कमी प्रकरणे पोलीस दरबारी पोचतात. याचा फायदा गुन्हेगाराना मिळत असतो. शिवाय अशा प्रकारचे गुन्हे कमी होतात असा समज संबंधित अधिकार्‍यांचा होतो. या पार्श्‍वभूवीर आता मूग गिळून गप्प बसणे बंद करण्याची गरज असल्याचे डिसिल्वा यांनी सांगितले. पुढील वर्षभरात सुमारे एक लाख पीडीत महिलांच्या कहाण्या गोळा करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. या माहितीच्या आधारावर लैंगिक अत्याचारांवर कोणती उपाययोजना करणे शक्य आहे त्याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे डिसिल्वा यांनी सांगितले.