पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
92

१८ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
निरीक्षक विश्वेश कर्पे यांची वेर्णे पोलीस स्थानकातून सीआय्‌डी, गुन्हा अन्वेषण विभाग, पणजी येथे, सुदेश वेळीप यांची मडगांव वाहतूक पोलीस विभागातून पणजी वाहतूक पोलीस विभाग येथे, उदय परब यांची राखीव पोलीस दलातून वेर्णे पोलीस स्थानक, ऍडविन कुलासो यांची राखीव पोलीस दलातून कुडचडे वाहतूक पोलीस विभाग, संतोष देसाई यांची राखीव पोलीस दलातून कोकण रेल्वे पोलीस स्थानक, के. व्ही. शेटगांवकर यांची लोकायुक्त/ सीआय्‌डी आर्थिक गुन्हे विभाग पणजी/ पेटिशन सेल येथून शिवोली किनारपट्टी पोलीस स्थानक, सुरेश गांवकर यांची मुरगांव पोलीस स्थानकातून दाबोळी विमानतळ पोलीस स्थानक, महिला पोलीस निरीक्षक लवलिन डायस यांची सीआय्‌डी- विदेश विभाग, पणजी येथून महिला पोलीस स्थानक येथे तर प्रवीण पवार यांची सीआय्‌डी, आर्थिक गुन्हे विभाग, पणजी येथून त्याच ठिकाणी बढतीवर बदली झाली आहे.
दत्तगुरु सावंत यांची एसआयटी पणजी येथून बढतीवर तेथेच बदली झाली आहे. शैलेश नार्वेकर यांची मुरगांव पोलीस स्थानकावरून बढतीवर तेथेच बदली झाली आहे. रामनाथ नायक यांची मडगांव सीआय्‌डी विभाग येथून तेथेच बढतीवर बदली झाली आहे. ब्रेण्डन डिसोझा यांची सीआयडी गुन्हा अन्वेषण येथून बढतीवर पर्वरी पोलीस स्थानक येथे, मोहन गावडे यांची फोंडा पोलीस स्थानकावरून बढतीवर सीआय्‌डी विशेष विभाग पणजी येथे बदली झाली असून त्यांना आय्‌जीपीचे विशेष अधिकारी म्हणून अतिरिक्त ताबा देण्यात आलेला आहे. फिलोमेना कॉस्ता यांची भ्रष्टाचार विरोधी विभाग/दक्षता येथून बढतीवर तेथेच बदलीवर तेथेच बदली करण्यात आली आहे. सतीश गावडे यांची फोंडा पोलीस स्थानकावरून सीआय्‌डी विशेष विभाग, पणजी येथे बदली करण्यात आली आहे. प्रदीप वेळीप यांची मायणा कुडतरी पोलीस स्थानकावरून बढतीवर नोटीस विभाग, आल्तिनो येथे बदली करण्यात आली असून त्यांना टीईसी, आल्तिनोचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. उदय गावडे यांची पेडणे पोलीस स्थानकावरून पणजी किनारपट्टी पोलीस स्थानक येथे बढतीवर बदली करण्यात आली असून त्यांना राजभवन येथील सुरक्षेचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.