पणजी (प्रतिनिधी)
पोलीस खात्यातील ४०० कर्मचार्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस खात्यातील पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार, शिपाई यांच्या बदल्यांचे दोन आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले आहेत. पहिल्या बदली आदेशात २४३ पोलीस कर्मचारी आणि दुसर्या बदली आदेशातून १५७ पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.