पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना बढत्या

0
5

गोवा पोलीस खात्यातील उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, हरिश्चंद मडकईकर आणि संतोष देसाई यांना पोलीस अधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कार्मीक खात्याने यासंबंधीचा आदेश काल जारी केला आहे. गोवा लोकसेवा आयोगाने तिघांना पोलीस अधीक्षकपदी बढती देण्याची शिफारस केली होती.