पोलीस खात्यातील उपनिरीक्षक भरती प्रक्रियेची एका बाजूने चौकशी सुरू असताना दुसर्या बाजूने उपनिरीक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे जाहीर केल्याने चौकशीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या वादाच्या भोवर्यात सापडलेली पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी हळदोण्याचे आमदार कार्लुस ङ्गरेरा यांनी विधानसभेत गृह व इतर खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेत बोलताना केली.
कुंकळ्ळी येथे वाहतूक
विभाग सुरू करा ः डिकॉस्टा
विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्ताचे काम केलेल्या सुमारे ७० टक्के पोलिसांना भत्ता देण्यात आलेला नाही. केपे परिसरातील चिरे काढण्याचा व्यवसाय बंद आहे. व्यावसायिकांनी परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पाडी येथे रस्त्याच्या बाजूला काकडी व इतर सामानांची विक्री करणार्या आदिवासी समाजातील नागरिकांना सामानाच्या विक्रीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याची गरज आहे. केपे परिसरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुंकळ्ळीत वाहतूक पोलीस विभाग सुरू करावा, असे आमदार आल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले.
वाहन अपघातात मृत्युमुखी पडलेला पोलिसांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातील ३० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. शिल्लक रक्कम लवकरच त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी, असे आमदार डिकॉस्टा यांनी सांगितले. केपे मतदारसंघातील रस्ते लहान असल्याने अग्निशामक दलाचे मोठे बंब ग्रामीण भागातील रस्त्यावरून नेताना त्रास सहन करावा लागतो. अग्निशामक दलाचे लहान अग्निशामक बंब उपलब्ध केल्यास गैरसोय दूर होऊ शकते, असे आमदार डिकॉस्टा यांनी सांगितले.
गोवा विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर सरकार आर्थिक संकटात असताना मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे, असे आमदार आलेमाव यांनी सांगितले. दक्षिण गोव्यात रेल्वे मार्ग दुपदरिकरणाविरोधात आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तथापि, केवळ चार पर्यावरण कार्यकर्त्यांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परराज्यातून येणार्यांना सरकारी नोकर्या मिळत असल्याचेही आमदार म्हणाले. पर्वरी पोलीस स्थानकाच्या कक्षेत येणार्या साळगाव मतदारसंघातील ५ गावांचा साळगाव पोलीस स्थानकांत समावेश करावा, अशी मागणी आमदार केदार नाईक यांनी केली. साळगाव मतदारसंघातील रेईश मागूश येथील पोलीस चौकीचे मागील तीन वर्षाचे भाडे प्रलंबित आहे. पोलीस चौकी एका खासगी इमारतीमध्ये सुरू आहे. इमारतीच्या मालकाला भाडे मिळविण्यासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. नवीन मद्य परवाने वेळेवर देण्यास प्राधान्य द्यावे, असेही आमदार नाईक यांनी सांगितले.
प्रशिक्षित पाडेलीची
व्यवस्था हवी ः फर्नांडिस
राज्यात पाडेलीची कमतरता भासत आहे. त्यामुळे नारळ उत्पादक शेतकर्यांना वेळेवर नारळ काढणे शक्य होत नाही. सरकारने गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या मार्ङ्गत प्रशिक्षित पाडेलीची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे सांताक्रुझचे आमदार रूडाल्ङ्ग ङ्गर्नांडिस यांनी सांगितले.
अमलीपदार्थप्रकरणाची दखल
गांभीर्याने घ्यावी ः आमोणकर
राज्यात अमलीपदार्थच्या प्रकरणामध्ये वाढ झाली असून युवा वर्ग अमलीपदार्थाकडे वळू लागला आहे. अमलीपदार्थ प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, असे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले. सडा येथील काही युवकांविरोधात बोगस तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर युवकांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी. अबकरी खात्याकडे मद्य व्यवसायिकांच्या परवान्याचे हस्तांतरणाचे अनेक अर्ज निकालात काढावेत असे आमोणकर म्हणाले.