>> कॉंग्रेसची निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार
उत्तर गोवा निवडणूक कक्षातील पोलीस उपनिरीक्षक ह्षिकेश पाटील हे टपालाद्वारे मतदान करणार्या पोलीस कर्मचार्यांवर भाजपला मतदान करण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार कॉंग्रेसने मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे काल केली.
राज्यात मतदान शांततेत पार पडल्यानंतर आता टपाल मतदानाचा विषय गाजत आहे. टपाल मतासाठी सत्ताधारी भाजपमधील नेत्यांकडून सरकारी कर्मचार्यांना आमिषे दाखविण्यात येत आहेत, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच केली आहे. आता भाजपला मतदान करावे, असा दबाव पोलीस उपनिरीक्षक ह्षिकेश पाटील आणत आहे, अशी तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी केली आहे. संबंधित उपनिरीक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक पाटील हे राज्यातील विविध पोलीस स्थानकांवरील पोलीस कर्मचार्यांशी संपर्क साधत असून, त्यांच्यावर भाजपला मतदान करण्यासाठी दबाव आणत आहे. तसेच काही पोलीस कर्मचार्यांना आपल्या समक्ष टपाल मतपत्रिकेवर मतदान करण्याची सूचना करीत आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.