पोलीस उपअधीक्षक भरती स्थगित ठेवणार

0
5

गोवा पोलीस खात्यातील 28 उपअधीक्षकाच्या थेट भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली ती स्थगित ठेवण्यात येणार आहे. गोवा लोकसेवा आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल ही बाब स्पष्ट केली.

गोवा लोकसेवा आयोगाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार पोलीस खात्यात 28 उपअधीक्षकांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. गोवा खंडपीठात या उपअधीक्षक थेट भरती प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका 9 पोलीस निरीक्षकांनी दाखल केली आहे. न्यायालयात या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. गोवा लोकसेवा आयोगाने या भरती प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण केल्यानंतर खंडपीठाने आव्हान याचिका निकालात काढली.

राज्य सरकारने उपअधीक्षक भरती प्रक्रियेत दुरुस्ती करायची असल्याने सुरू केलेली भरती प्रक्रिया थांबविण्याची सूचना गोवा लोकसेवा आयोगाला केली आहे.