पोलीस अधीक्षक गावस यांची आयपीएसपदी नियुक्ती

0
99

पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांची आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यासंबंधीची अधिसूचना केंद्रीय गृह खात्याने परवा ९ सप्टेंबर रोजी काढली आहे.
अरविंद गावस हे १९८७ साली उपनिरीक्षक म्हणून गोवा पोलीस सेवेत दाखल झाले होते. सध्या वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक असून त्यांनी म्हापशाचे पोलीस उपाधीक्षक वाहतूक पोलीस विभागाचे (उत्तर) उपाधीक्षक म्हणूनही काम केलेले आहे. २००३ साली त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांनी अतिरिक्त अधीक्षक (उत्तर गोवा), अधीक्षक (मुख्यालय), अधीक्षक (उत्तर गोवा), अधीक्षक (दक्षिण गोवा) म्हणूनही काम केलेले आहे. २००६ साली त्यांना मुख्यमंत्र्यांचे पोलीस पदक, तर २०१३ साली राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त झाले होते.