पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी

0
15

सरकारने पोलीस खात्यातील दोन उपअधीक्षक व दोन निरीक्षकांची बदली केली असून, उपअधीक्षक संतोष देसाई यांची मडगावचे एसडीपीओ, तर उपअधीक्षक सलीम शेख यांची वास्कोचे एसडीपीओ म्हणून बदली केली आहे. निरीक्षक राहुल परब यांची पर्वरी पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे, तर निरीक्षक धितेंद्र नाईक यांची पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना ताबडतोब आपल्या पदाचा ताबा घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.