पोलिसाच्या आत्महत्येप्रकरणी दोन महिला पोलिसांना अटक

0
53

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस शिपाई प्रथमेश गावडे याच्या आत्महत्येप्रकरणी प्रीती बापू चव्हाण (23) आणि तनिष्का अशोक चव्हाण (21) या दोन महिला पोलीस शिपायांना काल अटक केली.

गुन्हा अन्वेषण विभागाने सदर दोघा महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. पोलीस शिपाई प्रथमेश गावडे याने झुआरी पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी स्वत: रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात या दोन महिला पोलीस शिपाई आपला छळ करीत असल्याचा आरोप केला होता. त्या दोघी महिला आगशी पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. या प्रकरणामध्ये या दोघांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. प्रथमेशच्या आत्महत्येप्रकरणी सविस्तर अहवाल उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला आहे.