पोलिसांच्या आरोग्याला प्राधान्य ः महासंचालक

0
166

राज्यातील पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती नूतन पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

पोलीस महासंचालकपदाचा ताबा मुकेश कुमार मिना यांनी काल स्वीकारला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मीना यांनी सांगितले की, पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. कोरोना काळात सेवा बजावताना अनेक पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल उचलले जाणार आहे.