पोर्तुगीजकालीन वारसा इमारतींकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष : आलेमाव

0
23

गोव्यातील वारसा इमारती ह्या पोर्तुगीज राजवटीत बांधण्यात आलेल्या असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार त्या वारसा इमारतींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केला. मोडकळीस आलेल्या ह्या वारसा इमारती कोसळाव्यात व राज्यातील पोर्तुगीज राजवटीच्या खुणा पुसल्या जाव्यात, यासाठी भाजप सरकार ह्या इमारतींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही आलेमाव यांनी केला.

ह्या इमारतींच्या नूतनीकरणासाठीचा कृती आराखडा त्वरित तयार करून त्यांची दुरुस्ती करावी. सोहळ्यांच्या आयोजनांवर कोट्यवधींचा सार्वजनिक निधी वाया घालवण्यापेक्षा सरकारने तो निधी वारसा इमारतींची दुरुस्ती व जतन यावर खर्च करावा, अशी सूचनाही आलेमाव यांनी केली.