जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने त्यादिवशी सरकारने उत्तर गोव्यातील रेईश मागूश आणि दक्षिण गोव्यातील दवर्ली आणि कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदारसंघातील मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. औद्योगिक कर्मचारी, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, सर्व खासगी अस्थापने तसेच उद्योग, व्यापार क्षेत्रातील रोजंदारीवरील व सामान्य कर्मचार्यांना ही सुट्टी लागू असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.