राज्यातील सात ग्रामपंचायतीच्या सात प्रभागांसाठी शनिवार दि. 25 मार्च रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 यावेळेत मतदान घेण्यात येणार आहे. डिचोली तालुक्यातील वेळगे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 5, वन म्हावळींगे पंचायतीच्या प्रभाग क्र. 6, सासष्टी तालुक्यातील ओर्ली पंचायतीच्या प्रभाग क्र. 6, राशोल पंचायतीच्या प्रभाग क्र. 1, सांगे तालुक्यातील काले पंचायतीच्या प्रभाग क्र. 2, केपे तालुक्यातील बाळ्ळी-अडणे पंचायतीच्या प्रभाग क्र. 4 आणि बार्शे-केपे पंचायतीच्या प्रभाग क्र. 7 मध्ये पोटनिवडणूक होत आहे. या सात ग्रामपंचायतीच्या सातही प्रभागांतून एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या प्रभागातील मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर झाली आहे.