पॉक्सोविषयक तक्रारींसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

0
9

राज्य सरकारने मुलांचे लैंगिक छळांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचे रक्षण होईल, तसेच त्या संदर्भातील तक्रारींची निष्पक्षपातीने चौकशी व्हावी, या उद्देशाने एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये सिल्व्हिया फर्नांडिस (शिक्षण उप संचालक), डॉ. उदय गावकर, (शिक्षण उपसंचालक), मेल्विन डिकॉस्टा, (शिक्षण संचालक, उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार), मनोज सावईकर, शिक्षण उपसंचालक (नियोजन), सिंधू प्रभुदेसाई, सहाय्यक शिक्षण संचालक (शैक्षणिक), ब्राझ टी. डी मिनेझिस, पोलीस उपअधीक्षक (उत्तर गोवा), राजेंद्र प्रभुदेसाई, पोलीस उपअधीक्षक (दक्षिण गोवा), डॉ. नंदिता डिसोझा (सेतू फाऊंडेशन, एनजीओ प्रतिनिधी), प्राची खांडेपारकर (संघ फाउंडेशन, एनजीओ प्रतिनिधी) सदस्य म्हणून आणि वर्षा नाईक, संचालक (प्रशासन) सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.