‘मकडी’ व ‘इक्बाल’ यासारख्या बॉलीवूडपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेची अभिनेत्री श्वेता बासू हिच्याबाबत काल एक धक्कादायक गोष्ट समोर आली. पोलिसांनी या २३ वर्षीय अभिनेत्रीला रविवारी देहविक्रय प्रकरणी एका हॉटेलात रंगेहाथ पकडले असून सध्या तिला सुधारगृहात धाडले आहे.
पैशांची चणचण व परिवाराची जबाबदारी यामुळे नाईलाजाई आपणास वेश्याव्यवसाय पत्करावा लागला असल्याचे श्वेताने सांगितले आहे. आपल्यासाठी सर्व दारे बंद झाली तेव्हा काहींना हा मार्ग दाखवला व आपल्याला त्यावर चालणे भाग पडले असेही तिने पोलिसांना सांगितले. आपल्याप्रमाणे इतरही काही अभिनेत्रींवर ही वेळ आल्याचे तिने म्हटले आहे.
‘कहानी घर घर की’ या एकता कपूरच्या मालिकेत बालकलाकाराच्या भूमिकेत सर्वप्रथम श्वेता नावारूपास आली होती. बॉलीवूडमध्ये सिनेमा मिळत नसल्याने तिने दक्षिणेकडे मोर्चा वळवला होता. तिथे अनेक गाजलेल्या तेलगू व तामीळ सिनेमांत तिने काम केले आहे.