पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

0
15

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने काल आणखी दोघांना अटक केली. पंकज कुमार आणि राजकुमार सिंग अशी संशयितांची नावे आहेत. पंकजला पाटणा आणि राजकुमारला हजारीबाग (झारखंड) येथून पकडण्यात आले. पंकजने नीटचा पेपर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या सील केलेल्या ट्रंकमधून चोरल्याचा आरोप आहे. पेपर चोरणे आणि ते पेपर वितरित करण्यात या दोघांचा हात आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी राकेश रंजन या मुख्य आरोपीला बिहारच्या नालंदा येथून अटक केली होती.