पेट्रोल, डिझेल स्वस्त

0
87

अबकारी शुल्कामुळे दर कपातीविषयी अस्पष्टता
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्याने केंद्र सरकारने देशात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. त्या निर्णयानुसार पेट्रोल प्रती लिटर २ रूपये ४२ पैशांनी व डिझेल २ रूपये २५ पैशांनी स्वस्त होणार आहे. ही कपात काल मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. मात्र याच बरोबर केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवर प्रत्येकी दोन रूपये अबकारी शुल्क लागू केल्यामुळे दर कपातीविषयी अस्पष्टता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रथमच कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवर प्रत्येकी दोन रूपये अबकारी शुल्क लागू केले आहे. नोव्हेंबर २०१४ पासून सरकारने आतापर्यंत चौथ्यांदा अबकारी शुल्क लागू केले आहे. यामुळे सरकारच्या महसुलात मोठी भर पडणार आहे.