>> राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये वाढ
राज्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ सुरू असताना आता राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित दरात (व्हॅट) वाढ केल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लीटर १ रुपये ३० पैसे आणि डिझेलच्या दरात ६० पैसे वाढ होणार आहे. पेट्रोलचा दर ८५ रुपयांवर पोहोचणार आहे.
राज्यातील पेट्रोल व डिझेलच्या व्हॅटमध्ये वाढ करणारी सूचना वित्त विभागाचे अवर प्रणव भट यांनी काल जारी केली. पेट्रोलवरील व्हॅट २७ टक्के आणि डिझेलवरील व्हॅट २३ टक्के करण्यात आले आहे. पेट्रोलवरील व्हॅट २
उत्तर गोव्यात पेट्रोलचा दर प्रति लीटर ८३.४० रुपये, दक्षिण गोव्यात ८२.९५ रुपये असा आहे. या दरात आणखी प्रति लीटर १.३० रुपये अशी वाढ होणार आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे त्रस्त बनलेल्या वाहनचालकांना आता आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर कृषी अधिभार लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोलच्या दरात आणखी वाढ होणार आहे.
राज्यातील पेट्रोलच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हॅटमध्ये कपात करण्यात आली होती. आता, इंधनावरील व्हॅटमध्ये वाढ केली जात असल्याने दरात वाढ सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उत्तर गोव्याच्या उपजिल्हाधिकार्यांना एक निवेदन सादर करून पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी काल केली. पेट्रोल, डिझेलच्या वरच्यावर होणार्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.