पेट्रोल व डिझेलवर लिटरमागे १.५० रु. अबकारी करवाढीचा निर्णय काल सरकारने घेतला. मात्र तेलाचे दर तसेच राहणार असल्याचे तेल महामंडळाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता असून पुढील दरआढाव्यावेळी करवाढ त्यात सामावून घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.मात्र, कर वाढवल्याने सरकारच्या तिजोरीत १३ हजार कोटी रुपये भर पडणार आहे. सध्याची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी त्याची मदत होईल. करवाढीपूर्वी दिल्लीत पेट्रोल रु. ६४.२५ प्रति लिटर तर डिझेल रु.५३.३५ प्रति लिटर होते. ते तसेच राहणार आहे.