पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

0
27

रशिया आणि युक्रेनमुळे भारतीयांनाही मोठा फटका बसू शकतो. रशिया-युक्रेन तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०३ डॉलरवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती २७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, पण गेल्या अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही; पण पाच राज्यांच्या निवडणुका संपताच इधनाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०३ डॉलरवर पोहोचली आहे.