पेट्रोल आणि डिझेल दरात कालपासून प्रति लीटर दोन रुपये कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे उतरल्याने सरकारला हे पाऊल उचलणे शक्य झाले आहे. गेल्या ऑगस्टपासूनची पेट्रोलच्या दरातील ही आठवी कपात आहे. नवे दर काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६२.३७ डॉलर एवढे खालीआले आहेत.