पेट्रोलवर सवलतीमुळे २०० कोटी महसूल घटला

0
146

खाण व्यवसाय बंद झाल्याने कर रद्द केल्याने पेट्रोलवर मूल्यवर्धित कर रद्द केल्यामुळे २०० कोटी रुपये महसूल घटला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितले.
दरम्यान, बंद खाणींमुळे ७० कोटी कमी महसूल मिळाल्याचे ते म्हणाले. २०१४ मध्ये वाणिज्य करातून मिळणारे उत्पन्न २७० कोटी रुपयांवर पोचेल, अशी माहिती त्यांनी दिली. काही बार्जमालक बीएमडब्ल्यू घेऊन फिरत आहेत व सरकारकडे पॅकेजसाठी मागणी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या करमणूक व ऐषाराम कराच्या महसूलात बर्‍याच प्रमाणात वाढ झाली आहे, अशक्ष माहिती त्यांनी दिली.
अबकारी कायद्याची फेररचना
विक्रीकर खात्यातील पदे भरण्याचे काम चालू आहे मात्र १७६ पैकी काही पदांची गरज नाही, असे पर्रीकर म्हणाले. अबकारी कायद्याची पूर्ण फेररचना करून रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यप्राशन करण्यास पूर्ण बंदी घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहाटे ४ वाजेपर्यंत मद्यालये खुली ठेवण्यास बंदी घातली पाहिजे, असे आपले मत असल्याचे ते म्हणाले. यापुढे अशा बाबतीत ठोस निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गळती कमी केल्यास वाणिज्य करापासून मिळणारा महसूल दुप्पट करणे शक्य आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. पहाटेपर्यंत मद्यालये खुली ठेवणार्‍यांकडे पार्किंग सुविधा व ड्रायव्हर असणे आवश्यक आहे. कर बुडवेगिरीवर कारवाई करण्यासाठी ब्युरो स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात मुद्रांकाची टंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचार करणार्‍यांची नावे दिल्यास कारवाई करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले. रेती उत्खननावर हरित लवादाने बंदी घातल्याने धोका निर्माण झाला आहे. काही कंत्राटदार रेतीऐवजी अन्य भूसा किंवा पावडरची भेसळ करीत आहे. आरएमसीत दुरुस्ती न केल्यास इमारती कोसळतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.