पॅराग्लायडिंगवर तूर्त बंदी

0
2

पेडणे तालुक्यातील केरी येथे पॅराग्लायडिंगची दुर्घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली आहे. राज्यात पॅराग्लायडिंगवर तूर्त बंदी घालण्यात आली असून, यासंबंधीचा आदेश पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी जारी केला. काही दिवसांपूर्वी केरी येथे पॅराग्लायडिंगवेळी दोघांचा बळी गेला होता. राज्यात पॅराग्लायडिंग करणाऱ्या ऑपरेटरना पर्यटन खात्याकडे परवानगी घेण्यासाठी अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यात बेकायदा पॅराग्लायडिंग करणाऱ्यांना 50 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.