पॅराग्लायडिंगमध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

0
2

केरी समुद्रकिनारी पठारावरील पॅराग्लायडिंग करत असताना मृत्युमुखी पडलेल्या पुणे येथील शिवानी दाभळे आणि सुमन नेपाळी यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर बेकायदा पॅरागाईडीग व्यवसाय करणाऱ्या शेखर रायजादा याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुणे येथील शिवानी दाभाडे ही युवती आयटी क्षेत्रात काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी केरी समुद्रकिनारी 18 रोजी ती आपल्या मित्रासोबत आली होती. त्यावेळी त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता केरी डोंगर पठारावर पॅराग्लायडिंग करण्यासाठी ती गेली होती. त्यावेळी तिला पायलट सुमन नेपाळी याने तिला पॅराग्लायडिंगमध्ये बसवले आणि तो तिला घेऊन गेला काही काळातच पॅराग्लाइडिंगची एक दोरी तुटली गेली आणि त्यानंतर अपघात होऊन डोंगरावर पडून दोघांचाही मृत्यू झाला होता.