पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा काल राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वीकारला. मात्र पर्यायी व्यवस्था होईपर्यंत चव्हाण हेच काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. त्यामुळे सद्यस्थितीत तेथे राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढून घेतल्यानंतर हे सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.