येथे मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहिले नाहीत. सोलापूर येथे कार्यक्रमावेळी त्यांच्या भाषणादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. त्यामुळे त्यांनी मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे म्हणाले होते. दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री भुपिंदर हुडा यांना मोदींच्या उपस्थितीत सरकारी कार्यक्रमावेळी हुर्यो घालण्याचा प्रकार झाला होता. काल रांची येथे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला.