पूर बळींची संख्या १६९

0
127

>> केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात स्थिती गंभीरच

केरळ, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांमधील पुरातील बळींची संख्या काल १६९ झाली असून या राज्यांमधील पूरग्रस्त भागांमधील अनेकजण अजूनही बेपत्ता असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

केरळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या ७६ झाली असून तेथील ५८ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील पूर बळींची संख्या ४० झाली आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागांत १०५ पथके जुंपण्यात आली आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. महाराष्ट्रातील पूर बळींची संख्या ४२ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुराच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माहिती दिली होती की राज्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी रोख पाच हजार रुपये दिले जातील व उर्वरीत मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.