पूर्ण काश्मीर ताब्यात घेऊ : बिलावल भुत्तो

0
92

पाकिस्तानात राजकारणात उतरायच्या तयारीत असलेले बिलावल भूत्तो यांनी काल, आपला पाकिस्तान पिपल्स पार्टी पक्ष भारताकडून पूर्ण काश्मीर ताब्यात घेऊ असे विधान केले. भारतातून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वीशीतील बिलावल काल पंजाबच्या मुलतान भागात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. काश्मीर पाकिस्तानचे आहे, त्याची एक इंच जागाही भारताला सोडणार नाही, असे ते म्हणाले. बिलावल हे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असीफ अली झरदारी व माजी पंतप्रधान बेनझिर भुत्तो यांचे पूत्र आहेत.