पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी औरंगजेब आलमगीरचे इस्लामाबादमधून बंदूकधाऱ्यांनी अपहरण केले आहे. औरंगजेब हा दुुचाकीवरून जात असताना दुचाकी जप्त करण्यात आली. काही कारस्वारांनी त्याला उचलून नेल्याचे सांगण्यात आले. औरंगजेब काही काळ हाफिजाबादमध्ये गुप्तपणे राहत होता. दहशतवादविरोधी कायद्यानुसार भारताने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी औरंगजेबला वाँटेड घोषित केले आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड औरंगजेब पाकिस्तानातील जैश या दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करायचा आणि दहशतवादी कारवायांसाठी काश्मीरमध्ये पाठवायचा.