>> पाकिस्तानी मंत्र्याची कबुली
पुलवामामधला हल्ला हे इम्रान खान सरकारचेच कृत्य असल्याची कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी त्यांच्या संसदेत दिली. यावेळी चौधरी म्हणाले की, पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचे यश आहे. भारताला आपण त्यांच्या घरात घुसून उत्तर दिल्याचे सांगत पुलवामा हल्ल्याचे श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष आणि इम्रान खान यांना दिले. भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन यांना सोडले नसते तर भारताने हल्ला केला असता असे पाकिस्तानच्या एका खासदाराने काल म्हटले होते. त्यावर पाकिस्तान हल्ल्यासाठी तयार होता असे चौधरी यांनी म्हटले.