पुलवामामध्ये परराज्यातून आलेल्या नागरिकांवर हल्ला

0
13

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आणखी एका इतर राज्यातून आलेल्या नागरिकांवर हल्ला झाला आहे. पुलवामाच्या यादेर येथे दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. सोनू शर्मा असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पंजाबमधील पठाणकोटचा रहिवासी आहे.

स्थानिक लोकांनी त्यांना पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातून आलेल्या लोकांवर हल्ले करण्यात येत आहेत. अलीकडेच श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या स्ङ्गोटात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, बुधवारी ६ एप्रिल रोजी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अन्सार गजवतुल हिंद आणि लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचे दोन दहशतवादी मारले गेले.