राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ६ कोरोना बळींची नोंद झाली असून, नवीन २५९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ८.६६ टक्के एवढे आहे.
गेल्या चोवीस तासांत केवळ २९९० स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील २५९ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार ५२८ एवढी झाली आहे. मागील चोवीस तासांत आणखी ६५५ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्के एवढे आहे.