पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी वडील, आजोबांच्या कोठडीत वाढ

0
23

>> पुणे न्यायालयाचा निर्णय; जामीन अर्ज फेटाळला

पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या पोलीस कोठडीत काल वाढ करण्यात आली. या अपघात प्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस पथकाने विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या दोघांना काल पुणे जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने या दोघांना 31 मेपर्यंत कोठडी सुनावली. यापूर्वी न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्यांनी पुन्हा एकदा जामीन अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळला आणि कोठडीत 31 मेपर्यंत वाढ केली.

अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी त्यांच्या वाहनचालकाला पैसे आणि भेटवस्तू देण्याचे अमिष दाखवून अपघाताचा आरोप स्वतःवर घेण्यास सांगितले होते. तसेच त्याच्यावर जबरदस्ती केली होती. त्यामुळे त्याच्या आजोबांना म्हणजेच सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. आता सुरेंद्र अग्रवालही 31 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत असतील.
पुण्यात बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने आधी 24 मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर या कोठडीत 28 मेपर्यंत वाढ करण्यात आली आणि आता ही कोठडी 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.