पुणे अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावे लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलीस ठरवतील असेही बाल न्याय मंडळाने म्हटले आहे.
दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.
काल बुधवारी सकाळी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी मुलगा दारू प्यायला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आफला आदेश जाहीर केला.