पुणेकडून एटीकेचा दारुण पराभव

0
87

एफसी पुणे सिटीने चौथ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या एटीकेला पराभवाचा धक्का दिला. पुण्यातील संघाने सामना ४-१ गोलफरकाने आरामात जिंकून यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त केला. सामना येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झाला.

कर्णधार मार्सेलिन्होने अनुक्रमे १३ व ६०व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला. पुणे सिटीसाठी अन्य गोल अनुक्रमे रोहित कुमारने ५१व्या व एमिलियानो अल्फारो याने ८०व्या मिनिटास केला. यजमान एटीकेचा एकमात्र गोल ५०व्या मिनिटास बिपिन सिंगने केला. मार्सेलिन्होने काल अप्रतिम खेळ केला. स्वतः दोन गोल करताना त्याने संघाच्या अन्य दोन गोलांत सिंहाचा वाटा उचलला. विश्रांतीला पुणे सिटी संघ एका गोलने आघाडीवर होता. आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एटीकेने सामन्यात चार गोल स्वीकारले. पुणे सिटीने एटीकेविरुद्ध नोंदविलेला हा सात सामन्यांतील चौथा विजय ठरला. पुणे सिटीला अगोदरच्या लढतीत दिल्ली डायनामोजने ३-२ फरकाने हरविले होते. आजच्या विजयासह पुणे सिटीने गुणतक्त्‌यात तीन गुणांसह खाते उघडले. एटीकेला पहिल्या लढतीत केरला ब्लास्टर्सविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पराभवामुळे त्यांचा एक गुण कायम राहिला.