पुढील 25 वर्षांच्या विजयाचेही लक्ष्य : शहा

0
9

भारतीय जनता पक्षातील चार पिढ्यांच्या संषर्घामुळेच पक्षाला आता चांगले दिवस आले आहेत. 2024 ची निवडणूक तर जिंकूच. मात्र, भाजपचे पुढील 25 वर्षांतील निवडणुकांमधील विजयाचे लक्ष्य आहे, अशी महत्त्वाकांक्षा केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काल अकोला येथे व्यक्त केली.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते अकोल्यात बोलत होते. शहा यांनी आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीतील विजयाचा कानमंत्र दिला.