पुढील 15 दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल

0
4

सभापतींची माहिती

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयाला पुढील 15 दिवसांत पूर्णविराम मिळू शकतो, असा विश्वास सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला. सभापती रमेश तवडकर यांच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावरील वक्तव्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळात आमदार नीलेश काब्राल यांना पुन्हा संधी मिळू शकते का ? या प्रश्नावर बोलताना सभापती रमेश तवडकर म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी नीलेश काब्राल यांच्याबरोबर आमदार दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, मायकल लोबो आदींच्या नावांची चर्चा सुरू आहे.
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून चर्चा सुरू आहे. आगामी पंधरा दिवसात या विषयाला पूर्णविराम मिळू शकतो. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेत येतो, असेही रमेश तवडकर यांनी सांगितले.