>> हवामान खात्याकडून सतर्कतेचे निर्देेश
राज्यात पुढाल तीन दिवसांत तापमानाचा पारा वाढणार असून त्यामुळे लोकांना असह्य अशा उष्णतेच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील तीन दिवस राज्यात उष्मा प्रचंड वाढणार असतानाच आर्द्र हवामान राहणार आहे. राज्यातील काही भागांत तर तापमान 35 ते 36 अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना विशेष करून दुपारच्या वेळेत कडक उन्हात बाहेर पडू नये, अशी सूचना हवामान खात्याने केली आहे. तसेच बाहेर पडायचेच झाल्यास डोक्यावर टोपी घालावी, पुरेसे पाणी प्यावे, उन्हाऐवजी सावली आहे अशा मार्गाने चालावे, हलके व सुती कपडे परिधान करावेत, असे म्हटले
आहे. रविवारी कमाल तापमान 36 तर किमान 22.5 अंश एवढे होते. असे खात्याने म्हटले आहे. खात्याने पुढील तीन दिवसांसाठी तापमानाचा यलो अलर्ट जारी केला आहे.