पुढील चार महिन्यांत खाण व्यवसाय सुरू करणार

0
92

मुख्यमंत्री पर्रीकरांकडून ग्वाही
पुढील चार महिन्यात राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याची हमी आपण देत असून त्या दृष्टीने सर्व तयारी आपण सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे एका समारंभात बोलताना दिली.
ज्या अनेक अडचणी खाण व्यवसाय सुरू करण्याच्या मार्गात येत आहेत त्यावर विचारविनिमय करून सोडविण्याचे प्रयत्नही चालू झाल्याचे त्यांनी सांगितले.
कुडचडे येथे १२.३८ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या सुसज्ज अग्नीशमन दलाच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पर्रीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नीलेश काब्राल, डॉ. प्रमोद सावंत, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, खासदार नरेंद्र सावईकर, कुडचडे नगराध्यक्ष कार्मेलिना फर्नांडिस व अन्य उपस्थित होते.
पर्रीकर पुढे म्हणाले की, नको त्या ठिकाणी नको त्या योजना राबविल्या असून त्यात नियोजन नसल्याने या प्रकल्पांची कामे रखडली आहेत.
सुरुवातीस मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अग्निशामक दलाचा झेंडा फडकाविला व नामफलकाचे अनावरण करून उद्घाटन केले. दलाचे संचालक अशोक मेनन यांनी स्वागत केले.