बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्यामुळे पुढील ४-५ दिवस पाऊस चालूच राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळू लागला असल्याचे हवामान खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले.