पुडुचेरीत कॉंग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा

0
73

पुडुचेरीतील कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. विश्वासदर्श ठरावाच्या एक दिवस आधी काल रविवारी आणखी दोन आमदारांनी राजीनामा देत कॉंग्रेसचा त्याग केला आहे. पुडुचेरीचे कॉंग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायणन आणि डीएमकेचे आमदार व्यंकटेशन यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला.
यामुळे सत्ताधारी कॉंग्रेसला आज सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करणे कठीण जाणार आहे. कॉंग्रेस आमदारांची संख्या आता फक्त ११ झाली आहे. पुडुचेरीतील व्ही. नारायणसामी यांच्या कॉंग्रेस सरकारला आज दि. २२ फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.