पीर्ण येथे स्वयंअपघातात युवकाचा मृत्यू, एक गंभीर

0
3

बुलेटची वीज खांबाला जोरदार धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात खोब्रावाडा कळंगुट येथील 14 वर्षीय युवक मयूर राणे याचा मृत्यू झाला. या अपघातात खोब्रावाडा येथील धनवीर गोलतकर हा 16 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. पीर्ण-बार्देश येथे काल रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. कळंगुटमधील चार युवक आमठाणे धरणावर गेले होते. ते घरी परत असताना पीर्ण येथे बुलेटवरील नियंत्रण सुटले व बुलेट रस्त्याशेजारी असलेल्या वीजखांबाला धडकली. यात बुलेटवर मागे बसलेला मयूर हा उसळून रस्त्यावर पडला. चालक धनवीर हाही यात गंबीर जखमी झाला. त्यांना त्वरित स्थानिकांनी रुग्णवाहिकेने म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरनी मयूर याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर धनवीर याच्यावर त्वरित उपचार सुरू केले आहेत. कोलवाळ पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.