नागरीकरण होणारे जास्त विभाग पीडीएखाली आणण्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सकारात्मक आहेत. नवीन पीडीएच्या प्रस्तावाबाबत येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
नागरीकरणाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने नवीन भाग पीडीएखाली आणणे आवश्यक बनलेले आहे. नवीन भागांचा पीडीएमध्ये समावेश करण्याबाबत योग्य निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर नियोजन खात्याचे कायद्यानुसार विभाजन करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले नव्हते. प्रादेशिक आराखड्याचे काम वेळेवर मार्गी लावण्यात आले नव्हते असे मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.