आम आदमी पक्षाने उत्तर गोवा विकास प्राधिकरणाच्या (पीडीए) विभाजनाला विरोध केला आहे.
नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर गोवा नगर विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव विचाराधिन असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पीडीएच्या विभाजनाला विरोध दर्शविला आहे. काल येथे आयोजित पत्रकार परिषदेला आपचे राज्य समन्वयक एल्वीस गोम्स, सरचिटणीस प्रदीप पाडगावकर, वाल्मिकी नाईक, आर्किटेक्ट डिनीम डिक्रुजयांची उपस्थिती होती. राजकीय नेत्यांचे पुर्नवसन करण्यासाठी नवीन पीडीएची निर्मिती केली जात आहे. पीडीए म्हणजे भ्रष्टाचाराची आगरे बनलेली आहेत. तसेच पीडीए म्हणजे पैसा कमावण्याचे साधन होऊन बसले आहे, असा आरोप वाल्मिकी नाईक यांनी केला.