पीएम किसानचा 14 वा हप्ता 27 जुलैला मिळणार

0
5

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरू असून, या योजनेचा 14 वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. येत्या 27 जुलैला पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे तोमर म्हणाले. 27 जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 14 व्या हप्त्याचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधील पंतप्रधान सीकर इथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तिथून ते देशातील 8.5 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना पीएम किसानचा 14 वा हप्ता हस्तांतरित करणार आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना अद्याप 13 वा हप्ता मिळाला नाही किंवा त्यांचे ई-केवायसी अद्याप झालेले नाही त्यांना 14 वा हप्ता मिळणार नाही. यासोबतच एखाद्याच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर त्यांचाही हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.