पासपोर्टशिवाय प्रवेश करण्याबाबत कठोर कायदा

0
2

>> केंद्र सरकार जारी करणार लवकरच कडक नियम

भारतात व्हिसा तसेच पासपोर्टशिवाय (पारपत्र) प्रवेश करण्याबाबत आता कठोर कायदा आणणार आहे. याबाबत लवकरच कडक नियम जारी केले जाणार आहेत. जर एखादा परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

जर कोणतीही परदेशी व्यक्ती बनावट कागदपत्रांसह भारतात प्रवेश करत असेल तर त्याला येथून हद्दपार केले जाऊ शकते. याशिवाय, 2 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, जो 7 वर्षांपर्यंत वाढवता येतो. त्याच वेळी 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

विविध चार नियम
हा नियम इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, 2025 अंतर्गत आहे, जो सरकार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करेल. इमिग्रेशन आणि परदेशी लोकांशी संबंधित विषयावर बनवलेले चार वेगवेगळे नियम एकत्र करणे हा त्याचा उद्देश आहे. सध्याच्या कायद्यानुसार अवैध पासपोर्ट किंवा व्हिसासह प्रवास करणाऱ्या परदेशी नागरिकांना 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. बनावट पासपोर्ट घेऊन प्रवेश करणाऱ्यांना जास्तीत जास्त 8 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 रुपये दंडाची तरतूद आहे.

नवीन विधेयक

नवीन विधेयकाच्या प्रस्तावानुसार, जर कोणताही परदेशी नागरिक विहित व्हिसा कालावधीपेक्षा जास्त काळ येथे राहिला, व्हिसा नियमांचे उल्लंघन केले किंवा कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात गेला तर त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास, 3 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. व्हिसा वा पासपोर्ट नसलेल्या व्यक्तीला घेऊन येणाऱ्यालाही जबाबदार धरले जाईल. अशा व्यक्तीला आणणास 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारू शकतो. तथापि, त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. जर दंड भरला नाही, तर वस्तू आणणाऱ्या व्यक्तीला ती जप्त करता येते किंवा ताब्यात घेतले जाऊ शकते.