गोवा बेकरी मालक संघटनेने पावाच्या दरात केलेली १ रुपया वाढ मागे घेतली असून सरकारने बेकरी मालकांसाठी मदत करण्यासाठी योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी काल केली आहे.
बेकरी मालक संघटनेने येत्या १० ऑक्टोबरपासून पावाच्या दरात १ रुपया वाढ करण्याची घोषणा केली होती. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बेकरी मालकांनी पावाच्या दरात केलेली वाढ मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. बेकरी मालकांना सरकारी पातळीवरून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे कामत यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.